
मुंबई ः मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने एम सी ए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर येथे ३३ व्या जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
१८ वर्षांखालील मुले व मुली व २१ वर्षाखालील मुले व मुली अशा एकंदर ४ गटांत ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत नावे नोंदविण्यासाठी मुंबईतील खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत दिनांक २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६, मोबाईल क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.