पीईएस कॉलेजच्या मोनाली धनगरची विद्यापीठ बॉक्सिंग संघात निवड 

  • By admin
  • October 2, 2025
  • 0
  • 122 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॉक्सिंग स्पर्धेत पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची खेळाडू मोनाली धनगर हिची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. 

आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत मोनाली धनगर हिने ४५ ते ४८ किलो वजन गटात शानदार कामगिरी नोंदवत आपला दबदबा कायम ठेवला. मोनालीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिसऱ्यादा निवड झाली आहे. मोनाली ही पीईएस शारीरिक शिक्षण काॅलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी, डॉ संदीप जगताप, डॉ उदय डोंगरे, प्रा सुरेश मिरकर आदींनी मोनालीचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *