
परभणी ः विजयादशमीनिमित्त गौरव क्रीडा मंडळाच्या वतीने मागील २० वर्षांपासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात येते. यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये क्रीडा साहित्य (शस्त्र पूजन) करण्यात आले.
या कार्यक्रमाला गौरव क्रीडा मंडळाचे साडेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास माने, परभणीचे तलााठी आणि वरिष्ठ खेळाडू भरत नखाते, आरटीओ विभागातील वरिष्ठ लिपिक नंदकिशोर कुंडगीर, क्रीडा संघटक व प्रशिक्षक महेशकुमार काळदाते (श्री शिवाजी हायस्कूल अकोला, परभणी रग्बी संघटनेचे सचिव शिवाजी खुणे, ज्ञानोदय कोचिंग क्लासेसचे संचालक मनीष जाधव, योगेश जोशी, अमोल बिचाले, मानव माने, गणेश सौदागर, अनिल डवरे, सुमित भुसारे, पूजा श्रीखंडे, शितल शिंदे, साक्षी चव्हाण, रोहिणी उफाडे, अक्षरा नरवडे, नंदिनी भोरे, तेजल शेंगुळे, सई इजाते, राधिका इजाते व इतर राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
या वेळी कैलास माने यांनी खेळाडूंना सामाजिक जीवनात खेळाचे महत्त्व व शस्त्रपूजन यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. भरत नखाते यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. महेशकुमार काळदाते यांनी खेळाडूंना करियरमध्ये खेळाचे महत्त्व व उपलब्ध संधी, खेळाडू आरक्षण याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. मनीष जाधव यांनी आभार मानले.