क्रीडा विकासासाठी सर्वांनी संघटीत व्हावे : डॉ संजय रोडगे

  • By admin
  • October 2, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

शालेय जिल्हा टेबल टेनिस व व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

सेलू (गणेश माळवे) ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नूतन विद्यालय सेलू येथे शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा तसेच सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सय्यद साजिद, जिल्हा सचिव गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ संजय रोडगे म्हणाले की, “सेलू तालुक्यातील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी सर्व संस्था चालकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. नूतन शिक्षण संस्था व श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात अद्ययावत क्रीडांगण व इनडोअर हॉल उभारण्यात आले आहेत. या सुविधांचा योग्य वापर झाला तर निश्चितच दर्जेदार खेळाडू घडतील.”जिल्हा ग्रामीण टेबल टेनिस स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये एकूण २२ संघांतील ११० खेळाडूंनी सहभाग घेतला.

पंच म्हणून चेतन मुक्तावार, संजय भुमकर, किशोर ढोके, अनुराग आंबटी, कुणाला चव्हाण, प्रा. सत्यम बुरकुले, सुरज शिंदे, जुलाह खुदुस यांनी काम पाहिले.

टेबल टेनिस स्पर्धेचा अंतिम निकाल

– १४ वर्षे मुले : नूतन विद्यालय सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल (द्वितीय), बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल (तृतीय).

– १४ वर्षे मुली : नूतन कन्या प्रशाला (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल (द्वितीय).

– १७ वर्षे मुले : नूतन विद्यालय (प्रथम), बोर्डीकर पोदार इंग्लिश (द्वितीय), बा बि नूतन इंग्लिश स्कूल (तृतीय).

  • १७ वर्षे मुली : बोर्डीकर पोदार इंग्लिश (प्रथम), प्रिन्स इंग्लिश (द्वितीय), नूतन विद्यालय (तृतीय).
  • १९ वर्षे मुले : जनाबाई महाविद्यालय गंगाखेड (प्रथम), नूतन महाविद्यालय (द्वितीय).- १९ वर्षे मुली : जनाबाई महाविद्यालय गंगाखेड (प्रथम).

व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम

या स्पर्धेत तालुक्यातील २१ शाळांचा सहभाग होता.

– १४ वर्षे मुले : नूतन विद्यालय (प्रथम), व्हिजन इंग्लिश (द्वितीय), बोर्डीकर पोदार इंग्लिश (तृतीय).

  • १४ वर्षे मुली : नूतन विद्यालय (प्रथम), व्हिजन इंग्लिश (द्वितीय), उत्कर्ष विद्यालय (तृतीय).

– १७ वर्षे मुले : प्रिन्स इंग्लिश (प्रथम), व्हिजन इंग्लिश (द्वितीय), नूतन विद्यालय (तृतीय).

  • १७ वर्षे मुली : व्हिजन इंग्लिश (प्रथम), नूतन विद्यालय (द्वितीय), बोर्डीकर पोदार इंग्लिश (तृतीय).

– १९ वर्षे मुले : नूतन महाविद्यालय सेलू (प्रथम).

या स्पर्धेत पंच म्हणून विक्रम गुट्टे, अनुराग आंबटी व जुलाह खुदुस यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *