क्रीडा सह्याद्रीच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान

  • By admin
  • October 2, 2025
  • 0
  • 87 Views
Spread the love

निफाड (विलास गायकवाड) ः शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त क्रीडा सह्याद्री निफाड व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, माजी मुख्याध्यापक चिंधू रोटे, वसंत सुपारे, बाळासाहेब सोनवणे, जयंत आहेर, रमेश वडघुले, दत्तू रायते, सुहास सुरळीकर, श्याम चौधरी, तसेच क्रीडा सह्याद्रीचे अध्यक्ष विलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात ‘नवदुर्गा क्रीडा पुरस्कार’ श्रद्धा अजित इंगोले, श्रद्धा किशोर सूर्यवंशी, कृतिका मोहन पाटील, जानवी मोतीराम जाधव, धनश्री मंगेश काकड, प्रतिक्षा सोमनाथ कर्डिले, सेजल गणेश चांगले, भूमी मंगेश जेऊघाले, कार्तिकी अमोल तांदळे, नेहा शरद शिंदे, स्वरा मनोज जाधव, रिया प्रदीप शिंदे, गौरी रविंद्र पाटील, स्नेता पवार, कोमल लोणारे, प्राची निफाडे, वैष्णवी धुमाळ, पूजा साळवे, आचल आहिरे, मोहिनी गायकवाड, गायत्री कुयटे, ईश्वरी मोरे, दुर्गा गुजाळ, आर्या जाधव, श्रावणी देसाई, दीप्ती बागुल, अनुष्का पाटील, स्नेहल मोरे, आरुषी गिते, आशिया खान, मैत्री आहिरे, पल्लवी निकम, खुशी शिंदे, आराध्या करेकर, सिद्धी तासकर, सेजल काकडे, अन्वी नागरे, प्रांजल कोटकर, सायली लगड, प्राजक्ता ढवळे अशा एकूण अनेक कन्यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, गौरवपदक व मानाचा फेटा अशा स्वरूपात पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना चिंधू रोटे यांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. तर क्रीडा सह्याद्री अध्यक्ष विलास गायकवाड म्हणाले की, “स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यातील अफाट शक्तीमुळे ती संकटांवर मात करून खंबीरपणे उभी राहते. आज क्रीडा क्षेत्रातही महिला खेळाडू अभिमानाने आपले स्थान निर्माण करत आहेत.”

कार्यक्रमासाठी क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, प्रतीक्षा कोटकर, अनिता बनकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, लखन घटमाळे, संदीप बोरसे, कार्तिक मोरे, हर्ष दायमा, सुयश वाघ, कृष्णा चव्हाण, आदित्य वाघ, दक्ष गायकवाड आदींसह शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता. सुहास सुरळीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन विलास गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *