
ठाणे (विष्णू माळी) ः जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धांना गावंडबाग टर्फ ग्राउंडवर उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व मुंबई विभाग संपर्कप्रमुख प्रमोद वाघमोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी क्रीडा शिक्षकांना डॉजबॉलचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.स्पर्धा प्रमुख म्हणून किशोर चव्हाण व मारुती साबणे यांनी काम पाहिले.
उद्घाटन सोहळ्यास अभ्यास गट समिती सदस्य नामदेव पाटील, क्रीडा पत्रकार विष्णू माळी, संतोष मदगे, दीपक काटे, वळवी, महिला आघाडी प्रमुख आयेशा वाडकर आणि अनवर यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षाखालील गटातील मुला-मुलींचे एकूण शंभर संघ सहभागी झाले आहेत. पावसाचे सावट असूनही खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मैदानावर मुलांच्या जोशपूर्ण खेळी, संघभावना आणि टाळ्यांचा कडकडाट पाहून स्पर्धेला खरी रंगत आली.संपूर्ण स्पर्धा ठाणे महानगरपालिका क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे व क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.