
जुन्नर ः कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय छात्र सेनाच्या कॅडेट यांनी गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान उपक्रम राबवला.
या प्रसंगी स्कूल परिसर स्वच्छ करत, स्वच्छ भारत अभियाना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एनसीसी कॅडेट यांनी स्वच्छता अभियान चर्चा सत्रात सहभाग नोंदवला. १ महाराष्ट्र सिंगनल कंपनी पुणे यांनी स्वच्छता अभियान कसे राबवावे या विषयी मार्गदर्शन तत्वे दिली. एनसीसी कॅडेट यांना देश प्रेम, स्वच्छ भारत कसा निर्माण व्हावा हा मुख्य उद्देश आहे. एनसीसी कॅडेट यांनी युवकांना पुढे आदर्श निर्माण केला. या स्वच्छता अभियानात स्कूलच्या प्राचार्या, तसेच सचिव, अध्यक्ष यांनी कॅडेटना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय छात्र सेना सीटीओ ऋषिकेश वालझाडे यांनी मार्गदर्शन केले.