
नागपूर ः जागतिक हृदय दिवस निमित्त स्थानिक वोकार्ड हॉस्पिटलने चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथून चार किलोमीटर वॉकेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.
वॉकेथॉन स्पर्धा श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील प्रिन्स गुप्ता, संदीप कुमार पंडित, आयुष फुलकर, स्वप्नील कांबळे, प्रतीक घोडाम, क्रिश बट्टी, डॉ संजय खळतकर यांनी पूर्ण केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वोकार्डचे रवी बागली, अजय काकडे, प्रशांत फुले आणि इतर सर्वांनी परिश्रम घेतले. सुरुवातीला स्पर्धकांसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी हृदय दिनानिमित्त त्यासंबंधी होणारे रोग त्याची काळजी इत्यादी विषयी जागृती निर्माण केली. सुरुवातीला काही खेळ, व्यायाम, प्राणायाम, झुंबा इत्यादी घेण्यात आले.
स्पर्धकांना अल्पोपहार, प्रमाणपत्र,वितरित करण्यात आले. महाविद्यालयाला स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यातील सर्व विद्यार्थ्यांना संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वंजारी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.