
छत्रपती संभाजीनगर ः आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत टाक बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत ८ सुवर्णपदक व २ रौप्यपदक अशी दहा पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली.
चिश्तिया कॉलेजतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत टाक बॉक्सिंग अकादमीच्या आठ खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. त्यात प्राची जमाले, राहुल अलाने, कृष्णा राऊत, प्रथमेश बेराड, शिवराय गरुड, विश्वजीत शुक्ला, यामीन कादरी, ईशान लाहोट यांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल टाक बॉक्सिंग अकॅडमीचे प्रशिक्षक राहुल टाक व रोहन टाक यांनी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी व डॉ संदीप जगताप यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.