
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयाच्या खो-खो खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या १९ वर्षांखालील गटात कांस्यपदक पटकावले.
या शानदार कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र पवार, उपप्राचार्य प्रा भरत वहाटूळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रा किशोरी हिवर्डे आणि डॉ अर्चना कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ रणजीत पवार यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत कर्णधार पायल रोत्रे, मोनिका हिरडे, अंजली हिरडे, वैष्णवी हिरडे, श्रुती झंजाडे, खुशी गिरी, अमृता गिरे ,जानवी हटवडे, स्नेहल लोडगे, प्रिया पुरभे, रोहिणी राठोड, पुनम बिबे यांनी शानदार कामगिरी बजावली.