
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जिम्नॅस्टिक, पॉवरलिफ्टिंग आणि बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभागी होत ११ सुवर्णपदक, ८ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदक मिळवले.
सोयगाव येथे झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मंगेश दुबे याने ६६ किलो वजन गटात सुवर्णपदक तसेच रोहन बनकर याने रौप्य पदक मिळवले. ओंकार पवार याने ७४ किलो वजन गटात रौप्यपदक, अमृतपाल सिंग संधू याने ८३ किलो वजन गटात सुवर्णपदक, ऋषभ मिश्रा याने ९३ किलो वजन गटात रौप्यपदक, जसप्रीत सिंग भाटिया याने १२०0 किलो वजन गटात सुवर्णपदक, जॉयदीप सिंग सतपाल याने १२० किलो वरील वजन गटात सुवर्णपदक, बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दीपक डाके याने ६६ किलो वजन गटात कांस्य पदक मिळवले.
साई सेंटर येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत शिवराय गरुड याने ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक, विश्वजीत शुक्ला याने ७५ किलो वजन गटात सुवर्णपदक आणि मुक्ताई सुरवसे हिने ७५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी हप्तेकर हिने व्हॉल्टिंग टेबल प्रकारात सुवर्णपदक तर बॅलन्सिंग बीम आणि ऑलराऊंड असे दोन रौप्यपदक मिळवले. रिद्धी हत्तेकर हिने बॅलेंसिंग बीम, फ्लोर एक्सरसाइज आणि ऑलराऊंड या तिन्ही प्रकारात तीन सुवर्णपदक आणि अनिवन बार व व्हॉल्टिंग टेबल प्रकारात दोन रौप्य पदक मिळवले. सुहानी आडणे हिने अनइव्हन बार प्रकारात कांस्य पदक आणि फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात रौप्यपदक मिळवले. श्रीरंग लोखंडे याने पॅररल बार, स्टील रिंग आणि ऑल राऊंड या तिन्ही प्रकारात कांस्य पदक मिळवले. विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक आणि विभाग प्रमुख डॉ शेखर शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्ष, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्या डॉ अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, क्रीडा मार्गदर्शक डॉ राणी पवार, प्रा देविदास जयस्वाल, ईशांत राय, अजय सोनवणे, रोहित तुपारे, लता कलवार आणि चेतन पठारे, पंडित भोजने यांनी खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.