
सातारा ः फिडेच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीत अन्वी राहुल शेळके हिला बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय फिडे क्लासिकल रेटिंग १५३७ गुणांकन इतके प्राप्त झाले आहे.
ही यशस्वी कामगिरी तिने जुन आणि जुलै महिन्यात पुणे आणि आळंदी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग स्पर्धेत तीन आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडूंना हरवून आणि एकाबरोबर बरोबरी साधून हे यश मिळवले .
अन्वी बुद्धिबळाचा सातत्याने सराव करत आहेत आणि त्यासाठी थ्री टु वन चेस अकॅडेमीचे प्रमुख आणि प्रशिक्षक प्रणव विजय टंगसाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.