
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात ज्ञान भवन इंग्लिश स्कूल, बजाजनगरचा राजवीर जाधव याने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत राजवीर जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि पुढील शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल ज्ञान भवन इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल शारदा बडे यांनी विशेष आनंद व्यक्त केला. तसेच प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षण क्षेत्रातील महर्षी हनुमान भोंडवे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी राम मायंदे, तसेच रेखा परदेशी, गणेश पाळवदे, सदानंद सवळे आणि वैभव पवार यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राजवीर जाधव यांना राष्ट्रीय पंच अशोक जंगमे आणि भीमराज रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढील विभागीय स्पर्धेतही ते चमकदार कामगिरी करण्यास तयार आहेत. राजवीर जाधवच्या या यशाने शालेय क्रीडा क्षेत्रात नवीन प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या मेहनतीला व त्यांच्या शिक्षक व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाला योग्य प्रतिष्ठा मिळाली आहे.