
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या, शारीरिक शिक्षण महाविद्यालय वडाळा येथील प्राचार्य डॉ घनशाम काशिनाथ ढोकरट यांच्या मातोश्री बालावती काशीनाथ ढोकरट यांचे गुरुवारी (२ ऑक्टोबर) दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.