
छत्रपती संभाजीनगर ः माणुसकी फाऊंडेशनतर्फे ४ व ५ ऑक्टोबर रोजी दान उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
भारत दरवर्षी २ ऑक्टोबरपासू जॉय ऑफ गिव्हिंग वीक साजरा करतो. या आठवड्यात शनिवार आणि रविवारी, टीम माणुसकी फाऊंडेशनने दान उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
या दान उत्सवाचा उद्देश फक्त दान मिळवणे नसून दान देण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे. दान हे फक्त पैसा किंवा वस्तु स्वरुपातच दिले जाते असे नाही तर आपला मूल्यवान वेळ देवून, विविध एनजीओ करत असलेल्या सामाजिक कार्याला जाणून घेवून त्यांचे कौतुक करणे, त्या संस्थेची जोडलेले राहून इतर व्यक्तींना त्यांच्या कामाशी जोडणे इत्यादी हे एका प्रकारचे दानच असू शकते.
दान उत्सव इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारी या ठिकाणी ४ व ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू असणार आहे. या दान उत्सवात एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोचवता येते. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या योग्य एनजीओ संस्थांची निवड करुन त्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या दान उत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन माणुसकी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८२२००४६७९, ९८२३३१२१०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.