
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या देवनार कॉलोनी मनपा उर्दु शाळा क्रमांक दोनचे शिक्षक मोहम्मद एजाज मोहम्मद गफूर काझी मोमीन या दिव्यांग शिक्षकाने नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या पॅरा राष्ट्रीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला.
ते गेली पाच वर्षे योगा करत आहेत. यापूर्वी मोमीन यांनी दोन राज्यस्तरीय योगा स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली होती. त्यांना योग प्रशिक्षक महेश कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मोमीन यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शाळेचे मुख्याध्यापक फारुकी साबेरुद्दीन यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे. या पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वात जास्त १७ पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : दिया जासूद, अमायरा पुसाळकर, आभा मुंडे, कल्पना कदम, आकाश बुरडे, वेदांत शिरगुप्पे, मोमीन अलियांज गफूर