
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा सेपक टकराॅ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मनपा शालेय सेपक टकराॅ स्पर्धा नुकतीच एकलव्य क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या २५ संघांचा सहभाग नोंदवण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन एसडीव्हीपी नितीन घनापुरे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पीआय ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा सेपक टकराॅ असोसिएशनचे अध्यक्ष एजाजभाई मलिक, उपाध्यक्ष डॉ प्रदीप तळवेलकर, सचिव ईकबाल मिर्झा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत मागील तीन वर्षांच्या पारंपरिक वर्चस्वाची छाया राखत, अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने तिन्ही वयोगटात विजयी संपादन केले.
विजयी संघाचे शालेय समितीचे अध्यक्ष एजाज मलिक, उपाध्यक्ष सैय्यद चांद, सचिव अमीन बादलीवाला, प्राचार्य डॉ बाबु शेख, उपप्राचार्य नईम बशीर व पर्यवेक्षक नाज़िम खान यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना शाळेतील क्रीडा प्रमुख प्रा वसीम मिर्झा, क्रीडा शिक्षक शहेबाज शेख व आसिफ मिर्झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अँग्लो उर्दू हायस्कूलच्या या विजयानंतर शालेय सेपक टकाराॅमध्ये संघाचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून, पुढील स्पर्धांसाठी उत्साह निर्माण झाला आहे.
विजयी संघातील खेळाडू
१९ वर्षांखालील मुले : सय्यद उवेस, फूरकान अहमद, मोहम्मद अदनान, रेहान साबीर, फैसल बाबा.
१७ वर्षांखालील मुले : खतीब रय्यान, मो. अफ्फान, माज काझी, शेख शहेबाज, मोहम्मद अरफात.
१४ वर्षांखालील मुले : खान साईम, उमर इलियास, उमर साबीर, मोहम्मद रय्यान, अरसलान सलाउद्दीन.