धाराशिवच्या ३१ खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

  • By admin
  • October 4, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

धाराशिव : लातूर येथे झालेल्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३१ खेळाडूंनी आपली निवड निश्चित केली आहे. राज्य स्पर्धा १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

धाराशिव येथील निवड झालेल्या मुलांच्या गटात (१४, १७, १९ वर्षे) रोहित गोरे, समर्थ कदम, अर्णव ढेकणे, प्रणित बनसोडे, अंश गायकवाड, अनुराग पाटील, संघर्ष कांबळे, अथर्व गरड, राधेश ढेकणे, विनीत कुमार रंगदळ, ऋत्विक ठाकर, हर्षवर्धन शिंदे, किरण हिंगमिरे, मल्लिकार्जुन कोणे व ऋतुराज मोरे यांचा समावेश आहे.

मुलींच्या गटातील निवड झालेल्या खेळाडूंमध्ये वैभवी सगट, सृष्टी जगदाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, प्रांजल भुतेकर, क्षितिजा निंबाळकर, संस्कृती कपाळे, संस्कृती नलावडे, श्रेयशी सरपाळे, स्वरा कांबळे, स्वरा फडकुले, मृणाल हजारे, तेजस्विनी बांगर, मधुरा महाजन, स्वराली पडवळ, सफल केसकर, वैष्णवी साळुंके यांचा समावेश आहे. 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी बी कासराळे, सचिव राजेश महाजन, सहसचिव सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, रवी जाधव, तसेच श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनीचे सचिव कुलदीप सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

खेळाडूंना त्यांच्या यशासाठी मार्गदर्शन करणारे प्रा राजेश महाजन, राम दराडे व माधव महाजन आणि सुमेध चिलवंत यांचे विशेष योगदान आहे. धाराशिवच्या या युवा तायक्वांदो खेळाडूंनी आपली मेहनत, चिकाटी व कौशल्य दाखवत राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *