
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयाची खेळाडू राजनंदिनी रगडे हिने आंतर महाविद्यालयीन जिम्नॅस्टिक स्पर्धेत, रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र पवार, उपप्राचार्य डॉ संगीता राजमाने व क्रीडा विभाग प्रमुख डॉ अर्चना कोल्हे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले. या खेळाडूला डॉ रणजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.