
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहराचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेख हबीब मेमोरियल क्रिकेट स्पर्धेला शनिवारी शानदार प्रारंभ झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार संजय केनेकर, माजी खासदार इम्तियाज जलील, माजी क्रिकेटर इक्बाल सिद्दिकी, उद्योजक विक्रांत भाले, न्यायाधीश सुनील भोसले, मासियाचे उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, आयोजन समितीचे संजय डोंगरे, तसेच मॅक्स हबीब व प्रदीप राठोड, संदीप दहाड, विजय आडलाकोंडा, दिनेश कुंटे, कर्मवीर लव्हेरा, विनोद माने, शाकीर राजा, शेख अन्वर, जयंत कुलकर्णी, सय्यद जमशीद, कांचन फाजगे, सतीश अन्वीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन किरण भोळे, प्रमोद उगाडे व अमोल पगारे यांनी केले. उद्घाटन सोहळा सुसंगतपणे पार पडला आणि उपस्थितांनी क्रिकेट स्पर्धेसाठी उत्साह व्यक्त केला. या टुर्नामेंटच्या माध्यमातून युवा क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, स्थानिक क्रिकेट समुदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.