टेनिस स्पर्धेत श्लोक आळंद, हृद्वी लिमकर अजिंक्य

  • By admin
  • October 6, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

सोलापूर ः सुहाना मसाले पुरस्कृत लॉन टेनिस स्पर्धेत १० वर्षांखालील मुलांच्या गटात सोलापूरचा श्लोक आळंद व मुलींच्या गटात बारामतीच्या हृद्वी लिमकरने अजिंक्यपद पटकाविले.

कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तृतीय मानांकित श्लोक याने पुण्याच्या प्रथम मानांकित रूचंदानी पलशचा ४-०, ४-१ असा पराभव केला.  मुलींच्या गटात बिगर मानांकित हृद्वीने नवी मुंबईच्या तृतीय मानांकित अनन्या जाधवचा ४-१, ५-३ असे हरविले.  

विजेत्या व उपविजेत्यांना महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे मानद संयुक्त सचिव राजीव देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सुनील आळंद, शोभा आळंद, स्वप्नील आळंद, मोनिका आळंद, संध्याराणी बंडगर व पर्ववेक्षक पूजा सालगुडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *