जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद 

  • By admin
  • October 6, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहर व ग्रामीण जिल्हास्तरावर आंतरशालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. 

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव भीमराज रहाणे व समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे आणि राज्य धनुर्विद्या संघटनेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष अशोक जंगमे, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे राष्ट्रीय पंच आशुतोष खिची, क्रीडा शिक्षक कैलास शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पंच म्हणून भीमराज रहाणे, अशोक जंगमे, आशुतोष खिची, विक्रम लाहोट, विठ्ठल नरके, विशाल वाघचौरे, कीर्ती सारडा, दीपक सुरडकर व शुभम जाधव यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली अशा गटात घेण्यात आली. विजयी खेळाडूंची विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली. सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महापालिका क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, गणेश पाळवदे, समीर शेख, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव भीमराज रहाणे, हरीश नागदकर, ममता खिची, आशुतोष खिची, अशोक जंगमे, विठ्ठल नरके, विशाल वाघचौरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विभागीय शालेय निवड झालेले खेळाडू

मुले ः ऋषिकेश बलांडे, उज्वल भांबर्डे, धर्मवीर गोंडगे, प्रसाद केरकर, रोहित जाधव, श्रेयस गाडेवाड, वैभव सोनवणे, कौस्तुभ देव, धीरज राजपूत, उमराज भालेकर, सुदर्शन राऊत, संस्कार बस्वदे, सुमित बरांडे, स्वरूप शिंदे, राजवीर जाधव, देव काळे, रितेश डिगे, अथर्व मुदनर, करण निकिता वाड, अखिलेश काळे खान मोहम्मद, ऋषिकेश बावळे, भूमन रेड्डी, कबीर गायकवाड, अर्णव माने, साईराज उणे, धीमय शेंगळे पाटील, शंतनू साळुंखे रुद्रसाई गुप्ता, अर्णव मुंदडा, शिवम पाटील, दर्शन जाधव.

मुली ः वैभवी आवारे, गायत्री देवरे, हर्षदा मुळे, मृगजा गोमदे, राजश्री मुसळे, दीप्ती काकडे, सुहानी देशमुख, त्रिवेणी काळे, सांची सोनवणे, जनिषा शेजवळ, गौरी सुरासे, आश्लेषा कापसे, दिव्या केदार, गार्गी कुलथे, रोहिणी फुलारे, ऋतुजा उणे, संस्कृती कोरडे, उन्नती घुसाळे, अक्षदा कापडणीस, अनन्या शेळके, रिया मुळीक, ध्रुवी देशपांडे, अक्षरा शेखावत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *