
धुळे ः साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रमोद बेडसे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्रीचे अध्यक्ष पराग बेडसे, संस्थेचे सेक्रेटरी अनिल सोनवणे, विश्वस्त अॅड गजेंद्र भोसले, दीपक अहिरराव, संजू पाटील, उत्तमराव बोरसे तसेच व्यवस्थापक मंडळ सदस्या उज्वला बेडसे, लाला मोरे, सुनिता नाईक तसेच विद्यालयाचे उपप्राचार्या प्रतिभा शिवदे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सीलाल बागुल, सतीष सोनवणे व संस्थेच्या संपूर्ण परिवारातर्फे प्राचार्य प्रमोद बेडसे यांचे अभिनंदन करण्यात आले.