
जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विशेष सहकार्याने आंतरशालेय मनपा स्तरीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जयेश सपकाळे, नम्रता बारे यांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत १४ शाळांमधून एकूण ३८ मुले तर १३ मुलींचा सहभाग होता. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. मुख्य पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे परेश देशपांडे, तर सहाय्यक पंच म्हणून प्रशांत पाटील, स्वप्निल निकम, सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना जैन स्पोर्टस अकॅडमीतर्फे पहिल्या ५ खेळाडूंना अनुक्रमे सुवर्ण, रोप्य व कास्य पदक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारूक शेख, वाजिद फाउंडेशनचे अनिस शाह, इंजिनियर सय्यद जाहिद, सिद्धिविनायक शाळेचे क्रीडा शिक्षक अनिल माकडे, सेंट टेरेसा शाळेचे बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत पाटील, जाणता राजा शाळेचे स्वप्निल निकम, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलचे बुद्धिबळ प्रशिक्षक सोमदत्त तिवारी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. विजेत्या पहिल्या ५ खेळाडूंची निवड जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आली.
मुले ः जयेश सपकाळे (सेंट जोसेफ), गिरीश बारी (स्वामी विवेकानंद कॉलेज), रामेश्वर शिंपी (डी एन कॉलेज), कार्तिक कासार (स्वामी विवेकानंद कॉलेज), तनिष्क चव्हाण (एस एल चौधरी शाळा), तर राखीव खेळाडू म्हणून कुशान चौधरी (ओरियन शाळा).
मुले ः नम्रता बारेला (स्वामी विवेकानंद कॉलेज), शर्वरी भुजबळ (स्वामी विवेकानंद कॉलेज), सिद्धी सोनवणे (बाहेती कॉलेज), उम्मकुल्सूम जाहिद (सेंट तेरेसा शाळा), गार्गी महाजन (स्वामी विवेकानंद कॉलेज). राखीव खेळाडू वृती जाखेटे (सेंट तेरेसा शाळा).