
सिनियर नॅशनल रँकिंग ज्यूदो स्पर्धेत ५२ किलो वजन गटात पटकावले सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर ः दिल्ली येथे ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या सिनियर नॅशनल रँकिंग ज्यूदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय ज्यूदो खेळाडू श्रद्धा चोपडे हिने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
सध्या भोपाळ भारतीय खेल प्राधिकरण येथे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेली जिल्हा ज्यूदो संघटनेच्या एमआयडीसी वाळूज बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवांनी ज्यूदो क्लबची खेळाडू, तिसगावची सुवर्ण कन्या श्रद्धा कडूबाळ चोपडे हिने ५२ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. या शानदार कामगिरीमुळे तिची आंतरराष्ट्रीय आशियाई ज्यूदो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
श्रद्धा चोपडे हिला प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोळंकी, मधुश्री देसाई, भीमराज रहाणे,अशोक जंगमे, शैलेश कावळे, कडूबाळ चोपडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात मानाचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा श्रद्धा चोपडेला नुकताच मिळाला आहे, श्रद्धा चोपडे हिने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्णपदक, ३ रौप्य पदक, ३ कांस्यपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेत ११ सुवर्ण पदक, ७ रौप्य पदक, २ कांस्य पदक मिळवले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करण्यासाठी आर्थिक मदतीची तिला गरज भासत आहे. महाराष्ट्र राज्यातील एखादा चांगला उद्योजक तिच्या आर्थिक मदतीला साथ देणारा मिळाला तर आणखीन तिचा विजयाचा आलेख उंचावेल अशी आशा आहे.
या सुवर्ण कामगिरीबद्दल श्रद्धा चोपडेला महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, सतीश पहाडे, योगेश धाडवे, गणेश शेटकर, विजय धिमान, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, लता लोंढे, विश्वजित भावे, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, भीमराज रहाणे,अशोक जंगमे, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, अमित साकला, संजय परळीकर, कुणाल गायकवाड, सुनील सिरस्वाल, मनिंदर बीलवाल, दत्तु पवार, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदुरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, सुधीर काटकर, विकास देसाई, शैलेश कावळे, सागर घुगे, राज जंगमे, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटील सर्व ज्युदो खेळाडू आणि पालक आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.