
सोलापूर ः पार्क चौक येथे झालेल्या शालेय शहर स्क्वॅश स्पर्धेतून अवंती नगर येथील लोकमंगल माध्यमिक प्रशालेच्या अस्मिता मोरे, कार्तिकी दळवी व प्रणाली चव्हाण या तिघींची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


अस्मिताने १९ वर्षांखालील गटात प्रथम आणि कार्तिकीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रणालीने १४ वर्षांखालील गटात चौथे स्थान मिळविले. त्यांना रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आमदार सुभाष देशमुख, अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे, कार्यकारी संचालक अभयसिंह साठे, मुख्याध्यापिका शुभांगी साठे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.