मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कौस्तुभ, मिहिरला विजेतेपद 

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई ः दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ एम सी ए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर येथे आयोजित केलेल्या ३३ व्या ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत ए के फाऊंडेशनच्या कौस्तुभ जागुष्टे याने ए के फाऊंडेशनच्या आदिल शेखला १३-१, १२-५ असे सहज हरवून १८ वर्षंखालील मुलांचे विजेतेपद पटकावले. 

या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ए के फाऊंडेशनच्या उमेर शेखने ए के फाऊंडेशनच्या रुद्र गवारेला तीन सेटमध्ये  नमवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. २१ वर्षाखालील युथ मुलांच्या अंतिम सामन्यात डी के सी सी च्या मिहिर शेखने ए के फाऊंडेशनच्या ओजस जाधवला रंगतदार लढतीत १६-९, ९-१२ , १७-१ अशी मात करून या गटात बाजी मारली. तर या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ए के फाऊंडेशनच्या शेख महम्मद रझाने ए के फाऊंडेशनच्या सार्थ मोरेला तीन सेटच्या झुंजीनंतर  हरवले.

विजेत्या खेळाडूंना मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिशनचे खजिनदार अजित सावंत, सहसचिव संजय बर्वे, कार्यकारिणी सदस्य योगिता चिपळूणकर व श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट कॅरम स्पर्धेचे आयोजक भालचंद्र पुजारी यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईचा संघ

१८ वयोगट मुले : १) कौस्तुभ जागुष्टे २) आदिल शेख ३) उमर शेख ४) रुद्र गवारे ५) आवेश शेख ६) सोहम शेख. १८ वयोगट मुली : १) सोनाली कुमारी २) सिमरन शिंदे ३) गौरी सावंत ४) ग्रीष्मा धामणकर ५) बोधी कांबळे ६) नाव्या सावंत.
२१ वयोगट मुले : १) मिहिर शेख २) ओजस जाधव. २१ वयोगट मुली : १) रुची माचीवाले २) दिशा सकट. संघ व्यवस्थापक : संजय बर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *