
क्रीडा सह्याद्री खेळाडूंचा लक्षवेधक खेळ
निफाड (विलास गायकवाड) ः महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर लगोरी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय अकरावी सीनियर अजिंक्यपद स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये नाशिक संघाने शानदार कामगिरी बजावत तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे सदस्य तुषार जाधव, छत्रपती संभाजीनगर सचिव, राष्ट्रीय पंच विलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लगोरी मार्गदर्शक तुषार जाधव यांनी लगोरी खेळाची माहिती व नियम खेळाडूंना सांगितले.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण मुलांचे बारा व मुलींचे आठ संघ सहभागी झाले होते. नाशिक संघातून कर्णधार विलास गायकवाड, दक्ष गायकवाड, सक्षम गायकवाड, आदित्य वाघ, नीरज तवर यांनी उत्कृष्ट खेळ करत नाशिक संघाला तृतीय क्रमांक मिळवून दिला. तसेच या स्पर्धेत बेस्ट ब्रेकर म्हणून विलास गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक संघाला तृतीय क्रमांक व नीरज तवर याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, प्रतीक्षा कोटकर, अनिता बनकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, लखन घटमाळे, संदीप बोरसे, कार्तिक मोरे, हर्ष दायमा, सुयश वाघ, कृष्णा चव्हाण, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.