
पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा ग्रामीण शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन १४ वर्षे मुले व १९ वर्षे मुले व मुली अशा गटात करण्यात आले होते. ही स्पर्धा जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ येथे घेण्यात आली. या स्पर्धेतून पुणे जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव आंतरराष्ट्रीय कोच विजय गुजर, उपाध्यक्ष सुरेशकुमार गायकवाड व जीवनलाल निंदाने, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव मनोज यादव, क्रीडा अधिकारी अश्विनी हत्तरगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभाग शालेय स्पर्धेकरिता पात्र झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्हा शालेय बॉक्सिंग स्पर्धा आयोजनामध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे पात्र पंच उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीरिता पार पाडण्याकरिता सोनवणे हॉस्पिटल, पुणे यांनी वैद्यकीय सेवा व ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, खेळाडू, वैद्यकीय अधिकारी, पंच, प्रशिक्षक, पालक यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.
याप्रसंगी राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आसिफ शेख, संजय यादव, मनोज डी यादव, पृथ्वीराज ओव्हाळ, अमोल धनावडे, चेतना वारे, कुणाल पालकर, आसिफ शेख, प्रदीप वाघे, अमन शर्मा, साहिल सरोदे, अंजनीकुमार जोगदंड, अनिल हगवणे, यश हरपाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेकरिता निवडण्यात आलेला संघ
१४ वर्षे मुले
सोहम कुचेकर (सरहद स्कूल गुजर निंबाळकरवाडी), प्रणव शिंदे (एल जी बनसुडे स्कूल पळसदेव), आर्यन बनसुडे (एलजी बनसुडे स्कूल पळसदेव), प्रसाद बनसुडे (एलजी बनसुडे स्कूल पळसदेव), कार्तिक पाटील (एंजल स्कूल उरुळी कांचन), द्विज शेळके (नालंदा स्कूल मंचर), सोहम शिंदे (एंजल स्कूल उरुळी कांचन), प्रथमेश गभाळे (नेताजी सुभाषचंद्र बोस फुलगाव), अर्णव बरकडे (श्री सिद्धिविनायक स्कूल शिक्रापूर), दर्शन शिंगारे (लोकसेवा स्कूल फुलगाव), वरद जाधव (श्री सिद्धिविनायक स्कूल शिक्रापूर).
१९ वर्षे मुले
कार्तिक बुरुड (नेताजी सुभाष चंद्र बोस फुलगाव), रितेश जावळकर (नेताजी सुभाष चंद्र बोस फुलगाव), आदित्य मंडलिक (नेताजी सुभाष चंद्र बोस फुलगाव), शौर्य शेवाळे (पंडित नेहरू विद्यालय कामशेत), अथर्व होनाळकर (नेताजी सुभाष चंद्र बोस फुलगाव), शार्दुल कुंभार (भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंदनगर), वैष्णव काळे (नेताजी सुभाष चंद्र बोस फुलगाव).
१९ वर्षे मुली
समृद्धी कळाने (राणी लक्ष्मीबाई सैनिक स्कूल पौड), सृष्टी जाधव (डॉ अस्मिता विद्यालय), हिना शेख (श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर), श्रावणी पांचाळ (राणी लक्ष्मीबाई सैनिक स्कूल, पौड), ईश्वरी पवार (भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंदनगर), त्रिशा बोंबले (कन्या विद्यालय चाकण), जेमी शेख (जोगेश्वरी माता विद्यालय), महिमा वर्मा (भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंदनगर).