नूतन भारत विद्यालयाचा शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये दबदबा

  • By admin
  • October 8, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

चार संघांची विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

नागपूर ः नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर नगर या शाळेतील ५ वयोगटाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यातील ४ वयोगटामधे विजेतेपद पटकावले.

१४ वर्षांखालील मुली, १७ वर्षाखालील मुली, १७ वर्षांखालील मुले व १९ वर्षांखालील मुले या चार वयोगटांमध्ये विद्यालयाच्या संघांनी विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे शाळेचे चार संघ भंडारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 

१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीमध्ये तिकडे विद्यालयाचा संघाला ११-७  अशा फरकाने पराभूत केले. १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत तिकडे विद्यालयाचा संघाला १२-२ असे हरवले. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत तिकडे विद्यालयाचा संघालर ५-० असा विजय नोंदवला. १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत तिकडे महाविद्यालयाचा संघावर ११-१ असा विजय साकारला. 

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक व एनआयएस प्रशिक्षक प्रणय सुखदेवे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. महिला प्रशिक्षण म्हणून कामिनी लांजेवार यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंना भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, मुख्याध्यापिका डॉ वंदना बडवाईक, राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ दर्शना पंडित तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

१४ वयोगट मुलींचा संघ

संतोषी ठाकरे, शर्वरी कोरे, आराध्या लांजेवर, खुशी शिवणकर, रिद्धी चेतुले, सेजल हेमने, सोनू धोटे, शिवानी धोटे, दुर्गेश्वरी तुपते, रेणू जांभुळकर, सोनल काशीकर, मानवी शेळके, धनश्री गायधाने, लावण्या कोरे, दिव्या मताले व श्रेया पालंदुरकर. 

१७ वयोगट मुलींचा संघ

दिव्यानी ब्रह्मणकर, संस्कृती जांभुळकर, विश्रांती काशीकर, निशा वाढई, वनश्री ब्राह्मणकर, सिद्धी कठाने, समीक्षा वाघमारे, प्रतिक्षा तरोने, यशश्री उके, धनश्री लोखंडे, रितिका नेवारे, उन्नती उके, सिद्धी कुल्लूरकर व भारती पवार. 

१७ वयोगट मुलांचा संघ

नयन तळमळे, प्रियांशू कठाने, नेहाल फाटे, सोहम राऊत, हर्षित सुखदेवे, दिशांत कांबळे, विराज कठाने, हर्ष कांबळी, क्रिश भुसारी, युगल हर्षे, नैतिक तरोने, नैतिक वासू व रवींद्र चोपकर.

१९ वयोगट मुलांचा संघ

हर्षद लोखंडे, आशिष सेलोकर, संकेत बावनकर, अनिकेत गव्हाणे, तुषार चुटे, शक्ती खेडीकर, जयेश विरुळकर, काव्य भुते, महेश चौहान, हर्षद देशपांडे, जिग्नेश अडकणे, यश चौहान व गौरव कांबळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *