
नागपूर ः मोहाली येथे झालेल्या सिनियर महिला टी २० ट्रॉफीच्या एलिट ग्रुप अ सामन्यात विदर्भ संघाने गुजरात संघाचा सात विकेट्सने पराभव केला.
१७ षटकांच्या मर्यादित सामन्यात विदर्भाच्या गोलंदाजांनी गुजरातला ८९/५ धावांवर रोखले. आर्या गोहाने (२/१५) आणि आरती बहेनवाल (२/१९) यांनी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली.
कर्णधार दिशा कासट (४०) आणि मोना मेश्राम (२९) यांनी सात विकेट्स आणि आठ चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. आरतीला तिच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः गुजरात ः १७ षटकांत ८९/५ (रेणुका चौधरी नाबाद ४२, आर्या गोहणे २/१५, आरती बहेनवाल २/१९) पराभूत विरुद्ध विदर्भ ः १५.४ षटकांत ९३/३ (दिशा कासट ४०, मोना मेश्राम २९).