
मुंबई ः मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या वतीने यश विद्या निकेतन, मनवेल पाडा, विरार पूर्व, पालघर येथे उत्साही वातावरणात संपन्न झाली. ही स्पर्धा १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुले/मुली,या वयोगटात पारंपरिक वैयक्तिक, कलात्मक एकल, कलात्मक जोडी आणि तालात्मक जोडी या प्रकारात नवीन नियमावलीनुसार खेळवण्यात आली.
या स्पर्धेचा उद्घाटन साेहळा पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी गिरीश इरनाक, क्रीडा अधिकारी अमृत घाडगे, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्त मेधा वर्तक, वसई विरार शहर महानगरपालिका जिल्हा क्रीडा प्रमुख योगेश चौधरी, जिल्हा क्रीडा उपप्रमुख लॉसन कोरिया, क्रीडा समन्वयक प्रमोद गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी सचिव महेश कुंभार, पालघर सचिव रुचिता ठाकूर, मुख्याध्यापिका श्वेता वैद्य यांची उपस्थिती होती. पालघर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव पाटील यांनी स्पर्धेच्या योग्य आयोजनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.
अंतिम निकाल
पारंपरीक योगासन विभाग.
१४ वर्षांखालील मुली – १. शिवानी मुंडा, नटवर नगर, मुंबई पब्लिक स्कूल, मुंबई उपनगर. कलात्मक एकल विभाग – १. श्रीया विलास आपटे, सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल, मुंबई उपनगर. तालात्मक जोडी विभाग – १. श्रीया विलास आपटे आणि वेदांगी कौलास सुर्वे सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल, मुंबई उपनगर. कलात्मक जोडी विभाग – १. श्रीया विलास आपटे आणि वेदांगी कौलास सुर्वे सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल, मुंबई उपनगर.
१७ वर्षाखालील मुली – पारंपरिक योगासन विभाग – १. काव्या गजेंद्र ताम्हणे कॅप्टन खींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण. कलात्मक एकल विभाग – १. आर्या विलास साप्ते. तालात्मक जोडी विभाग – १. आर्या विकास साप्ते आणि ऋग्वेदा मिलिंद मुळगांवकर.
१९ वर्षाखालील मुली – पारंपरिक योगासन विभाग – १. युगांका किशोर राजम के जे सोमय्या ज्यू कॉलेज ऑफ सायन्स मुंबई उपनगर. कलात्मक सिंगल विभाग – १. उर्वि मोरे डी ए वी पब्लिक स्कूल ठाणे मनपा. तालात्मक जोडी विभाग – १. आदिती प्रजापती- चैतन्या शेट्टी फातिमा हायस्कूल आणि ज्यू कॉलेज ठाणे . कलात्मक जोडी कार्यक्रम – १. आदिती प्रजापती- चैतन्या शेट्टी फातिमा हायस्कूल आणि ज्यू कॉलेज ठाणे.
१४ वर्षाखालील मुले ः पारंपरिक विभाग – १. रुद्र शुक्ला गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे. कलात्मक एकल विभाग – १. जेनीश छाभाया गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे. तालात्मक जोडी विभाग – १. साई सांगळे – शार्दुल फलके भाऊसाहेब परांजपे विद्यालय ठाणे. कलात्मक जोडी विभाग – १. स्वयंम गवारी – साई सांगळे भाऊसाहेब परांजपे विद्यालय ठाणे.
१७ वर्षाखालील मुले ः पारंपारिक विभाग – १. विधीश राऊत डॉ पांडुरंग वामन अमृते शिक्षण पालघर. कलात्मक एकल विभाग – १. विधीश राऊत डॉ पांडुरंग वामन अमृते शिक्षण पालघर. तालात्मक जोडी विभाग – १. श्रीरंग लाडके – श्रेयस गारकर भाऊसाहेब परांजपे विद्यालय ठाणे. कलात्मक जोडी विभाग – १. पार्थ परब – स्वराज फिस्के कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूल मुंबई उपनगर. पारंपारिक विभाग – १. देव सिंग ठीक जी. पविचक मुल होणे मनपा. कलात्मक एकल विभाग – १. देव सिंग डी ए वी पब्लिक स्कुल ठाणे मनपा. तालात्मक जोडी विभाग – १. वरद चव्हाण – पारस मोरे भाऊसाहेब परांजपे विद्यालय ठाणे. कलात्मक जोडी विभाग – १. वरद चव्हाण – पारस मोरे भाऊसाहेब परांजपे विद्यालय ठाणे.