
सेलू ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नूतन विद्यालय सेलू यांच्या वतीने शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा नूतन विद्यालयाच्या इनडोअर क्रीडा हॉलमध्ये उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ व्ही के कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथमच मातीच्या ऐवजी कबड्डी मॅटवर सामने खेळविण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाचा नवा आणि रोमांचक अनुभव घेता आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एस एम लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजय मुंढे (राज्य क्रीडा मार्गदर्शक परभणी), डी डी सोन्नेकर (जिल्हा सचिव योगासन संघ), गणेश माळवे (जिल्हा सचिव टेबल टेनिस), प्रशांत नाईक (तालुका क्रीडा संयोजक), पी आर जाधव (जिल्हा अध्यक्ष शिक्षक संघटना) तसेच माधव शिंदे, ज्ञानेश्वर गिरी, भारत धनले, तुकाराम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलगे व मुली अशा एकूण ५४ संघांतील ६३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. उत्साह, स्पर्धात्मकता आणि क्रीडा भावना यांचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.
बक्षीस वितरण सोहळा
समारोप प्रसंगी कृउबा माजी सभापती दिनकर वाघ, जयप्रकाशजी बिहाणी, संजय मुंढे, कैलास काळे, गुलाब रोडगे, गणेश माळवे, किशन भिसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नाईक यांनी केले, तर किशोर ढोके यांनी आभार मानले.
पंच व आयोजन समितीचे योगदान
स्पर्धेत पंच म्हणून डॉ खाजा ए खदिर, योगेश जोशी, शेख कलिम, राहुल अंबेगावकर, गोपाळ गावंडे, अर्जुन भिसे, धीरज नाईकवाडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संजय भुमकर, राजेश राठोड, किशोर ढोके, राहुल घांडगे, प्रा सत्यम बुरकुले, कुणाल चव्हाण, सूरज शिंदे, अनुराग आंबटी, समाधान मस्के, विशाल ढवळे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षे मुली गट : १. पाथरी तालुका, २. सेलू तालुका.
१७ वर्षे मुली गट : १. गंगाखेड तालुका, २. जिंतूर तालुका.
१९ वर्षे मुली गट : १. सेलू तालुका, २. गंगाखेड तालुका.
१९ वर्षे मुले गट ः १. नूतन महाविद्यालय, सेलू तालुका, २. गंगाखेड तालुका.
१७ वर्षे मुले गट : १. गंगाखेड तालुका, २. सेलू तालुका.