
आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा
नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने तसेच ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नागपूर यांच्या सहयोगाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेत एस एस एन जे कॉलेज, देवळी संघाने आकर्षक खेळ करत विजेतेपद पटकावले.
ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या मैदानावर अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एसएसएनजे कॉलेजच्या संघाने ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या संघाचा पराभव केले. त्यामुळे ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डीएनसी कॉलेज नागपूर संघाने तृतीय क्रमांकाचे बक्षिस पटकावले.
यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्य विष्णू चांगदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे व माजी शारीरिक शिक्षण प्राध्यापक दत्तात्रय खरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे कार्यवाह संचालक डॉ संभाजी भोसले या आयोजक तर ज्योतिबा कॉलेजचे प्राचार्य डॉ विजय दातारकर आणि शिक्षक प्रभारी डॉ सुरेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली.
विष्णू चांगदे यांनी खिलाडूवृत्तीने खेळणाऱया खेळाडूंचे कौतुक केले तर डॉ देवेंद्र भोंगाडे यांनी विद्यार्थिनींच्या मैदानी खेळातील सहभागाचे कौतुक केले. डॉ संभाजी भोसले यांनी या खेळाला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे असे आवाहन केले.
निवड चाचणी अध्यक्ष डॉ भीमराव पवार, डॉ समशेरसिंग सरोहा यांच्यासह डॉ सविता भोयर, जय क्षीरसागर, शशांक बोकारे, डॉ दाढे व तंत्र अधिकारी सचिन यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विजय दातारकर यांनी सूत्रसंचालन केले. महेशकुमार महतो यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशात ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे पदाधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.