
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ इंदिराबाई भास्कराव पाठक महिला कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन तायक्वांदो (महिला व पुरुष) क्रीडा स्पर्धेत इंदिराबाई भास्कराव पाठक महिला महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत महिला गटात १४ महाविद्यालयांतील ४४ खेळाडू, तर पुरुष गटात २४ महाविद्यालयांतील ४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. दिवसभर झालेल्या रोमांचक सामन्यांत विविध वजन गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली.
पारितोषिक वितरण व समारोप
स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट रोहन श्रीरामवार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक व माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ सचिन देशमुख, तसेच माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ अपर्णा कोत्तापल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मुख्य पाहुण्यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेतील त्यांचा जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ मनीषा वाघमारे, प्रा अश्विनी शहाणे, उमेश शेटे, तसेच तेजस्वीनी साळवे, आरती ठाकुर आणि अमृता गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ तायक्वांदोतील कौशल्यच नव्हे तर शिस्त, आत्मसंयम आणि क्रीडाभावाचेही दर्शन घडवले. इंदिराबाई भास्कराव पाठक महिला महाविद्यालयाने या यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रातील आपली अग्रणी परंपरा कायम ठेवली आहे.
महिला गटातील निकाल
अंडर ४६ किलो वजन गट
१. मानसी मानकापे (आर सी कॉलेज, पाथरी)
२. वैशाली नरवाडे (मिलिंद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. ऋतुजा जाधव (पीईएस कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
४. चंचल बडवे (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ४९ किलो वजन गट
१. मयुरी गावंडे (एमएसएस कॉलेज, अंबड)
२. रिद्धी सोमवंशी (एम एस एम कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. भाग्यश्री जाधव (संत तुकाराम कॉलेज, कन्नड)
४. अल्गुज देशमुख (एम पी लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ५३ किलो वजन गट
१. वेदिका अजमेर (एसबीईएस कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. वैष्णवी वारे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. संजीवनी नाजन (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
४. तेजल काकडे (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ५७ किलो वजन गट
१. पायल घुगे (एमआयटी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. वैष्णवी पालसकर (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. वैष्णवी जिगे (परळी वैजनाथ कॉलेज)
४. आयुतरंग टाकळे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ६२ किलो वजन गट
१. समृद्धी सांगळे (आर सी कॉलेज, पाथरी)
२. अश्विनी वानखेडे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. ऋतुजा रानवळकर (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ६७ किलो वजन गट
१. महेशन युनुस (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. मधुबाला लोहार (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. तनुजा पालसकर (पी जी जिमखाना, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ७३ किलो वजन गट
१. साक्षी बागडे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. मेघा ताराटे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. समीक्षा कांबळे (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
४. रोहिणी हातकांगणे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ७३ किलो व त्यावरील वजन गट
१. मुक्ताई सुर्दसे (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. माया साळवी (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. फाल्गुनी गोरमे (आयबीपी महिला कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
पुरुष गटाचा अंतिम निकाल
अंडर ५४ किलो वजन गट
१. जयेश पाथरे (टोपे कॉलेज, जालना)
२. अभिषेक ज्ञानेश्वर (आर सी कॉलेज, पाथरी)
३. प्रीतम गोटेव (डी डी कॉलेज, वाळूज)
४. सागर संतोष (केएसके कॉलेज, बीड)
अंडर ५८ किलो वजन गट
१. सोमेश नंदगायळी (विद्याधन कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
२. साई दंडवते (एस के गांधी कॉलेज, कडा)
३. राज कोल्हे (शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
४. शेख यासीन शेख (बलभीम कॉलेज, बीड)
अंडर ६३ किलो वजन गट
१. रितेश गायकवाड (राजकुंवर कॉलेज, जालना)
२. प्रतीक कांबळे (केएसके कॉलेज, बीड)
३. विशाल शेंडगे (ॲडव्होकेट बी डी हंबर्डे कॉलेज, आष्टी)
अंडर ६८ किलो वजन गट
१. देवेंद्र जोशी (केएसके कॉलेज, बीड)
२. मोहम्मद शहाबाज (आंबेडकर लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. शेख अस्लम (सर सय्यद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
४. खान वसीम सलीम (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
अंडर ७४ किलो वजन गट
१. अमोल जराड (गांधी कॉलेज, जालना)
२. शाम दोईफोडे (देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)
३. आदित्य चव्हाण (स्वामी विवेकानंद कॉलेज, मंठा)
४. ऋतुराज सुरडकर (राजर्षी कॉलेज, पाथरी)
अंडर ८० किलो वजन गट
१. सुदर्शन गायकवाड (बलभीम कॉलेज, बीड)
२. पठाण तौवर खान (एमएसएस कॉलेज, जालना)
अंडर ८७ किलो वजन गट
१. विष्णू चव्हाण (स्वामी विवेकानंद कॉलेज, मंठा)
अंडर ८७ किलो व त्यावरील वजन गट
१. हृत्वीक तांदळे (बी पी एड कॉलेज, बीड)
२. गिरीश बडगुजर (एमआयटी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर)