
कर्नल सी के नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव अॅड कमलेश पिसाळ यांनी बीसीसीआयच्या कर्नल सी के नायडू ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष अंडर-२३ संघाची घोषणा केली आहे. आक्रमक फलंदाज सचिन धस हा संघाचे नेतृत्व करणार आहे.
एलिट ‘सी’ गटातील पहिल्या दोन सामने महाराष्ट्र संघ खेळणार असून हे सामने अनुक्रमे नाशिक आणि पुणे येथे होणार आहेत. पहिला सामना १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सौराष्ट्र विरुद्ध गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे होईल. तर दुसरा सामना २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू विरुद्ध डेक्कन जिमखाना मैदान, पुणे येथे खेळवला जाईल.
महाराष्ट्र पुरुष अंडर-२३ संघ
सचिन धस (कर्णधार), दिग्विजय पाटील (उपकर्णधार), अनिरुद्ध साबळे, निरज जोशी, अनुराग कवडे, किरण चोरमले, साहिल औताडे, शुभम मैड, अब्दुस सलाम, राजवर्धन हंगरगेकर, वैभव द्वारकुंडे, स्वराज चव्हाण, अजय बोरुडे, अभिषेक निशाद, हर्ष मोगवीरा, निखिल लुनावत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्व निवड झालेल्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.