डॉ जितेंद्र लिंबकर यांना व्हिएतनाममध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी आमंत्रण

  • By admin
  • October 11, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

चेंबूर नाका एमपीएस शाळेचा अभिमान वाढविणारा क्षण

मुंबई : ग्लोबल पीस थ्रू अ होलिस्टिक लेन्स – Integrating Yoga, Physical Education and Traditional Sports या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी चेंबूर नाका एमपीएस शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ. जितेंद्र लिंबकर यांना आमंत्रण प्राप्त झाले आहे. 

हे चर्चासत्र GLC Yog School यांच्या पुढाकाराने FPT University, Danang (Vietnam) आणि BPCA College, Mumbai (India) यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आले आहे.

या यशाबद्दल आज चेंबूर नाका शाळा संकुलातील सर्व शिक्षकांनी डॉ जितेंद्र लिंबकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचा व कार्यनिष्ठेचा हा योग्य गौरव असल्याचे सर्वांनी एकमुखाने सांगितले.या प्रसंगी यशवंत पवार म्हणाले, “हा त्यांच्या कार्याचा व परिश्रमाचा गौरव आहे.”

रोहित कुलकर्णी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.” तर चेतना मुळीक यांनी सांगितले, “डॉक्टरेट ही शिक्षणातील सर्वोच्च पदवी असून डॉ लिंबकर यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.”या कार्यक्रमाला पद्मिनी नारकार, अर्चना साबळे, मालन म्हात्रे, जागृती पाटील, स्नेहल दौंड, ऋतुजा जोगधनकर आणि सिमरम मॅडम उपस्थित होत्या.

मुख्याध्यापिका श्रीमती इंद्रजीत कर, तसेच सायली काजरोळकर, सोनाली नाईक, मनीषा कांबळे आणि फरहाणा मॅडम यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भारतातून शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळाचे प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट, तसेच डॉ कैलास असाई, डॉ जयसिंग होटकर, डॉ राजेंद्र शेळके आणि डॉ विशाल साळवे सहभागी होणार आहेत. डॉ लिंबकर यांचे हे यश महाराष्ट्रातील शिक्षण व क्रीडा क्षेत्रासाठी गौरवाचे ठरेल, अशी भावना सर्व शिक्षकवर्गाने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *