
१९ वर्षाखालील गटात ईशान खांडेकर व रुचिता दरवणकर विजेते
नांदेड : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल, नांदेड येथे आयोजित दिया चितळे पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा आज उत्साहात पार पडली.
या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आणि बक्षीस वितरण सोहळ्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ ए एम महाजन, प्राचार्य डॉ व्ही यू गवई, नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आणि प्राचार्य एल पी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बक्षीस वितरण त्यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी डॉ महाजन यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी खेळाडूंना ट्रॉफी, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आणि सचिव डॉ अश्विन बोरीकर यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत १७ व ११ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा होणार असून, नांदेड जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धांचा लाभ घ्यावा. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे नांदेडमध्ये टेबल टेनिस खेळाबद्दल नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१९ वर्षाखालील मुलींचा गट : विजेता : रुचिता दरवणकर (पुणे), उपविजेता : हर्पिता पटेल (ठाणे), तृतीय विजेती : श्रावणी लोके (ठाणे), तृतीय विजेती : सुकृती शर्मा (ठाणे).
१९ वर्षाखालील मुलांचा गट : विजेता : ईशान खांडेकर (पुणे), उपविजेता : युवराज यादव (ठाणे), तृतीय विजेता: कौस्तुभ गिरगावकर (पुणे), तृतीय विजेता : नील मुळे (मुंबई).
महिला गट : विजेती : प्रीता व्हर्टीकर (पुणे), उपविजेती : श्वेता नायर (मुंबई), तृतीय विजेती : मुक्ती दळवी (ठाणे), तृतीय विजेती : सुकृती शर्मा (ठाणे).
पुरुष गट : विजेता : अर्णव करणवाल (ठाणे), उपविजेता : नील मुळे (मुंबई), तृतीय विजेता: शौनक शिंदे (पुणे), तृतीय विजेता: मंदार हर्डीकर (ठाणे).