
नाशिक ः मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्षांखालील खो-खो स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद संपादन करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत आयोजित १९ वर्षांखालील खो -खो पुरुष स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पहिला सामना लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय सुकदेव महाविद्यालय असा झाला. त्यात १५ गुणांच्या फरकाने हा सामना पंचवटी महाविद्यालयाने जिंकला. तसेच दुसरा सामना हा एकलव्य या संघाविरुद्ध २४ विरुद्ध १२ अशा फरकाने जिंकला व अजिंक्यपद प्राप्त केले.
सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्या डॉ सुचिता सोनवणे व क्रीडा संचालक प्रा किशोर राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ संपदा हिरे, विश्वस्त डॉ अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.