
चिपळूण ः जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे पार पडली. यामध्ये १४ वर्षे वयोगटाखालील मुले स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी एसीबी इंटरनॅशनल स्कूल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या संघामध्ये निशांत जाधव,सात्विक कांडवेलकर, अर्चित घोसाळकर, रायन जोसेफ, तेजस पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सर्व खेळाडूंची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक मनिष काणेकर व अमित पांचाळ यांचे संस्थेचे पदाधिकारी अमोल भोजने, सायली भोजने, पूजा खताते, प्रशालेचे मुख्याध्यापक राकेश भुरण, नेहा महाडिक व मुकुंद ठसाळे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.