
बीड ः छत्रपती संभाजीनगर शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी चॅम्पियन्स अकॅडमी बीड व बीड जिल्ह्यातील २२ खेळाडूंची विभागीय संघात निवड झाली आहे अशी माहिती तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यातर्फे १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथे यावर्षीची राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा १४, १७ व १९ वर्षे वयोगटात पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ८ प्रशासकीय विभागातून निवड झालेले जवळपास ३०० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. बीडच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा या तायक्वांदो स्पर्धेवर आपले वर्चस्व राखताना विभागीय स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. विजेत्या खेळाडूंमध्ये बहुतांश खेळाडू हे जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमीचे खेळाडू आहेत.
१४ वर्ष गटातील विजेते खेळाडू – सानवी राठोड, कल्याणी घुगे, श्रेयश वाव्हळ, निखिल आंधळे व विनोद गारदी (वडवणी).
१७ वर्ष गटातील विजेते खेळाडू – राष्ट्रीय खेळाडू यशस्वी चव्हाण, कार्तिकी मिसाळ व श्रवण तांबारे यांच्यासह दर्शनी शिंदे, समर्थ आंधळे, सार्थक ठेंगल, स्वराज घोडके व यश चव्हाण यांची निवड झाली आहे.
१९ वर्षे गटातील विजेते खेळाडू – राष्ट्रीय खेळाडू ओंकार परदेशी, अभिषेक आमटे, सुमित राऊत, धनंजय आतरकर, माऊली पवार, नेहा आंधळे व साक्षी केकाण (अंबाजोगाई), कृष्णा धुमाळ (आष्टी) यांची निवड झाली आहे.
डॉ अविनाश बारगजे व जया बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रशिक्षक म्हणून शेख अनिस, देवेंद्र जोशी, ऋत्विक तांदळे, नितीन आंधळे व बाळासाहेब आंधळे, बालाजी कराड यांनी काम पाहिले.