
सोलापूर ः हरिभाई देवकरण प्रशालेचे क्रीडा शिक्षक व क्रिकेटचे मार्गदर्शक प्रकाश कंपली यांना रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे “नेशन बिल्डर अवॉर्ड” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा रंगभवन येथील मेसानिक हॉलमध्ये पार पडला. शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२५ चा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश फोफलिया आणि रो. उपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कंपली यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती ऐकताना त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे तेज आणि उपस्थितांच्या हृदयात उत्साहाचे तरंग दाटून आले. गेली अनेक दशके क्रीडा क्षेत्रातील असंख्य विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम, संघभावना आणि आत्मविश्वास यांचे अमूल्य संस्कार यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची पताका फडकावत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे शिस्तीचे मंदिर, प्रामाणिकतेचे प्रतिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.