
रावेर ः नाशिक येथे शालेय विभागीय स्पर्धेत रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रियदर्शनी त्रिपाठीने १७ वर्षांखालील गटात अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या उत्कृष्ट यशाबद्दल गोदावरी स्कूलचे क्रीडा मयूर पाटील व ममता प्रजापत, शितल महाजन यांनी अभिनंदन केले. तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्य डॉ केतकी पाटील, डॉ वैभव पाटील, स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.