जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे अंडर १९ मुलांची निवड चाचणी रविवारी

  • By admin
  • October 13, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

जालना : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेसाठी जालना जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी रविवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी साई काणे क्रिकेट अकॅडमी, अॅस्ट्रो टर्फ, एमआरडीए स्कूल जवळ, रोहनवाडी रोड, जालना येथे पार पडणार आहे, अशी माहिती सचिव राजू काणे यांनी दिली.

या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी १ सप्टेंबर २००७ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी नियोजित दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत निवड चाचणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

निवड चाचणीसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, टीसी, दहावीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या सत्यप्रतांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात आणि स्वतःचे क्रिकेट साहित्य घेऊन उपस्थित राहावे, अशी सूचना आयोजकांनी दिली आहे.

या निवड चाचणीतून पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

ही निवड प्रक्रिया जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड नरेंद्र देशपांडे, सचिव राजू काणे, तसेच सदस्य अभिजीत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी 98233 73361 किंवा 99229 33138 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *