
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व ओएनजीसी पुरस्कृत मलबेरी कॉटेज, महाबळेश्वर आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्या प्रशांत मोरेला रंगतदार लढतीत २५-२२, १७-२५ व २१-१५ असे नमवून या गटाचे विजेतेपद पटकावले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जळगावच्या संदीप दिवे याने बाजी मारली. त्याने मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरला असे हरवले. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या चैताली सुवारेनी मुंबईच्या रिंकी कुमारीवर १९-१६, १७-२४ व २१-१७ अशी चुरशीच्या लढतीत मात करून विजेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या ममता कुमारीवर विजय मिळवला.
विजेत्या खेळाडूंना सुनील भाटिया व प्रदीप भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व हौशी कॅरम असोसिएशनचे ऑफ साताराचे सदस्य सुनील चतुर उपस्थित होते.