पुणे येथे दिव्यांग क्रिकेट खेळाडूंसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी शिबीर

  • By admin
  • October 14, 2025
  • 1
  • 93 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग (अस्तिव्यंग) क्रिकेट खेळाडूंसाठी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड आणि ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड यांच्या मान्यतेने तसेच दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा या संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ऑक्टोबर रोजी प्रकाश खांदवेज् विस्डम क्रिकेट अकॅडमी,लोहगाव, पुणे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत निवड चाचणी शिबीर होणार आहे.

सदर निवड चाचणी शिबीर अनुभवी माजी खेळाडू श्रीकांत काटे, सौरभ रावळिया, मिलिंद गुंजाळ या त्रिस्तरीय सदस्यांच्या मार्फत होणार आहे. या निवड चाचणी शिबिरातून निवड झालेले खेळाडू सदर संस्थेच्या होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये खेळतील. निवड चाचणी शिबिरास येताना पांढरा ड्रेस, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि स्वतःचे क्रिकेट किट सोबत आणावे.

महाराष्ट्रातील सर्व अस्थिव्यंग दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी शिबिरास उपस्थित राहून आपल्या क्रिकेट खेळाचे कौशल्य सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी माजी भारतीय दिव्यांग खेळाडू राजू मुजावर (8459597308) यांच्याशी संपर्क साधावा.

1 comment on “पुणे येथे दिव्यांग क्रिकेट खेळाडूंसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *