
विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत संस्कार माध्यमिक विद्यालयाने प्रभावी खेळ सादर करत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्कार विद्यालयाच्या संघाची विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी राजे संभाजी सैनिकी स्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अखेरच्या निर्णायक सामन्यात संस्कार माध्यमिक विद्यालयाने बळीराम पाटील विद्यालयावर १६-३५ अशा गुणांनी विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संघाने संपूर्ण सामन्यात शिस्त, वेग आणि एकजुटीचे उत्तम प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना चकित केले.
विजयी संघाचे खेळाडू
सुरज मस्के, भावेश साळुंके, सार्थक सुरे, कृष्णा आधाने, जयराज सूर्यवंशी, आर्यन पायगव्हाण, वैभव ब्रम्हनाथ, ओमकार इधाटे, प्रतीक दौड, व्यंकटेश पवार, विश्वजीत गडदे आणि दर्शन पाटील या खेळाडूंचा विजेत्या संघात समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट चढ-उतारांमध्ये आत्मविश्वासाने खेळ करत विजय मिळवला.
या शानदार यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश देसले, सचिव लीना देसले, मुख्याध्यापिका संगीता काळे तसेच शिक्षकवर्गातील सिद्धिकी राहत कौसर, ज्योती तळेले, सुषमा जोशी, सतीश तायडे, गोपाल सुरडकर, संतोष डांगे, क्रीडा विभाग प्रमुख अरुण भोसले पाटील, क्रीडा शिक्षक जावेद पठाण, अनुप बोराळकर, विश्वजीत मासरे, संकेत मदने आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विजयामागे खेळाडूंची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाचे प्रोत्साहन या तिन्ही घटकांचा उत्तम संगम दिसून आला. खेळाडूंनी संघभावना, शिस्त आणि निर्धार यांच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी सादर केली.