
पुणे ः कोकणस्थ परिवार पुणेचे वतीने १५ ऑक्टोबर राष्ट्रीय अंध दिनानिमित्त राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अंध क्रीडापटूंसाठी स्वर्गीय रामचंद्र आवारे यांचे स्मरणार्थ क्रीडा साहित्याचे वाटप कोकणस्थ परिवार, पुण्याच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष राजेंद्र आवारे यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते. चंद्रकांत खराटे यांनी स्वागत केले तर श्रीनाथ हगवणे यांनी प्रास्ताविक केले. अमोल करचे यांनी आभार मानले. पराग गानू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सत्कारमूर्ती वैशाली सोनावळे, आशा दुधवडे, सुनीता पावरा, सोनाक्षी गायकवाड, गौरी देशमुख, दिव्या सुतार, निकिता भालेराव, आरती जयस्वाल, श्वेता गुप्ता, आरती राठोड, कीर्ती शेलार, मयुरी गरुड, स्वप्नाली सोनावळे, शामल धेंडे, वैष्णवी नावडकर, करिष्मा कावरे, अनिता नवगिरे, तर मुलांमध्ये गणराज जाधव, शिवलाल जाधव, शुभम गायकवाड, गणेश जाधव, शांताराम जाधव, निशांत माने, वैभव मांढरे, प्रज्वल बिरे, दिनेश पाडाळे, रोहित भरगुडे, संकेत शर्मा, शंतनू धांगेकर, ऋषिकेश राजमाने, संदीप जाधव यांचा समावेश आहे.