छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय १६ वर्षाखालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघांची निवड चाचणी स्पर्धा १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २०१० नंतरची असावी, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. खेळाडूंनी निवड चाचणीस येताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ही निवड चाचणी स्पर्धा संभाजीनगर विभागातील हिंगोली, परभणी, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीच्या माध्यमातून विभागीय संघाची निवड होणार असून, निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
विभागीय सचिव सतीश पाठक, जालना जिल्हा सचिव काझी अक्रम, परभणी जिल्हा सचिव नाविद पठाण, हिंगोली सचिव नाविद पठाण तसेच छत्रपती संभाजीनगर व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी उन्मेष शिंदे, प्रवीण शिंदे, प्रफुल कुलकर्णी, सोमनाथ पचलूरे, श्रीमती ज्योती दांडगे, अभिजीत दिख्खत, लोकेश ठाकरे, अभिषेक गणोरकर, जब्बार पठाण, आसिफ पठाण, रोहित पाटील, आशिष शुक्ला, नारायण शिंदे, विलास राजपूत, गणपत पवार व सोमनाथ टाक यांनी सर्व इच्छुक खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी सतीश पाठक (९४२३७४५२५८), जब्बार पठाण (८८०६८४९०२२) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणी स्पर्धेद्वारे संभाजीनगर विभागातील उदयोन्मुख व्हॉलीबॉल प्रतिभांना राज्य पातळीवर झळकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.