 
            छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स वुशू लीग या स्पर्धेमध्ये अल हिदाया पब्लिक शाळेतील विद्यार्थिनी शेख जुनेरा फातेमा हिने चमकदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले आहे.
राणी अवतांबाई तालुका क्रीडा संकुल कोराडी, नागपूर येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स वुशु लीग स्पर्धेमध्ये शेख जुनेरा फातेमा हिने आपली शानदार कामगिरी दाखवत सुवर्णपदक पटकावले आणि छत्रपती संभाजीनगर विभागाला तिसरा क्रमांक प्राप्त करून दिला.
शेख जुनेरा फातेमा ही अल हिदाया पब्लिक शाळेतील आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. जुनेराच्या या शानदार कामगिरीबद्दल वुशू असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव महेश इंदापुरे तसेच एस वाय वुशू मार्शल आर्ट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व प्रशिक्षक सय्यद सद्दाम, सय्यद जुबेर, बंटी राठोड, सुमित खरात, सय्यद अत्यब, सय्यद जहूर, शेख रिजवान यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शेख जुनेरा फातेमा ही एस वाय वुशू मार्शल आर्ट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.



